वर्ध्यात नरबळी: मांत्रिकानं मुलाचे डोळे, किडनी भाजून खाल्ली

संपूर्ण वर्धा जिल्ह्यात खळबळ माजवून देणार्याी रूपेश मुडे या बालकाच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.रुपेश मुळेची हत्या अघोरी विद्येतून नरबळी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

Updated: Nov 16, 2014, 12:49 PM IST
वर्ध्यात नरबळी: मांत्रिकानं मुलाचे डोळे, किडनी भाजून खाल्ली title=

वर्धा: संपूर्ण वर्धा जिल्ह्यात खळबळ माजवून देणार्याी रुपेश मुळे या बालकाच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.रुपेश मुळेची हत्या अघोरी विद्येतून नरबळी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

संपूर्ण वर्धा जिल्ह्याला हादरवून टाकणारी हदयद्रावक घटना ही चिमुकल्या रुपेश मुळेची आहे. रूपेश हा ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शाळेतून घरी आला. त्यानंतर तो परिसरात खेळायला गेला. रूपेश हा सायंकाळपर्यंत घरी परतला नाही. त्यामुळं घरच्यांची शोधाशोध सुरू झाली. परिवारामध्ये संशय निर्माण झाला. सायंकाळी ८ वाजता रूपेश गायब झाल्याची घटनेची तक्रार वर्धा पोलीस ठाण्यात त्याच्या आईवडिलांनी दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह हा ९ नोव्हेंबरला विकास विद्यालयाच्या पाठीमागे आढळला. रूपेशच्या संपूर्ण शरीराचे अवयव काढून त्याचं प्रेत सापडलं. त्यामुळं त्या हत्याकांडामध्ये क्रूरता तथा अंधश्रद्धेचा प्रकार दिसून आला. शेवटी त्या गंभीर कृत्याचा छडा वर्धा पोलिसांनी लावला. 
आरोपीची धक्कादायक कबुली

घटना अशी की, ८ नोव्हेंबर रोजी कारला इथला रहिवाशी असलेल्या ऑटोचालक आरोपी आसीफ शहा वल्द अजीम शहा ऊर्फ मुन्ना पठाण यानं रूपेशचं सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अपहरण केलं आणि त्याला ऑटोमध्ये बसवून महाकाळस्थित नदीजवळ आणलं. त्याची त्यानं क्रूरपणे हत्या केली. नंतर त्यानं त्याच्या शरीरातील अवयव काढले. त्यानंतर त्या अवयवांची विधिवत पूजा करून नंतर भाजून त्यानं खाल्लेसुद्धा अशी किळसवाणी कबुली त्यानं पोलिसांना दिली. 

मुन्ना पठाणनं एका अघोरी विद्येच्या पुस्तकामधून ही संपूर्ण मांत्रिक विद्या घेतली होती, असंही त्यानं कबूल केलं. त्या विद्येमधून त्याला धनसंपत्ती मिळणार असल्याचंही त्यानं सांगितलं. रूपेश हा पायाळू असल्याचीही त्याला आधी माहिती होती. त्यामुळं तो संपर्कात असल्याचं निदर्शनास आलं. अंधश्रद्धेमधून हा अघोरी प्रकार असून अत्यंत क्लेशदायक आहे. रुपेशची हत्या झाली तेव्हापासून वर्धा पोलीस तथा गुन्हे अन्वेषण विभागाच्या तीन तपास पथकांनी तपासाची चक्रं वेगानं फिरविली आणि त्यांना या आरोपीला हस्तगत करण्यात यश आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.