नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स चालू ठेवण्याच्या शासनाच्या निर्णय़ाला हिंदू जनजागृती समितीनं विरोध केलाय.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी शासनानं हा निर्णय मागे घेण्याची मागणी समितीनं केली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी शासनानं ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज केला आहे. त्यावरही हिंदू जनजागृती समितीन आक्षेप घेतलाय. अशा प्रसंगी पोलीस चुकीचे कामे करणाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना रान मोकळ करून देत असल्याचा आरोप समितीने केलाय.