डोंबिवली : डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागातले रहिवासी सध्या प्रदूषणाचा अतोनात त्रास सहन करत आहेत. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्यानंतर, अधिका-यांकडूनच उलट उत्तरं स्थानिकांना ऐकावी लागत आहेत.
एम आय डी सी भागामध्ये दुर्गंधी आणि प्रदुषणामुळे डोंबिवलीकर त्रस्त झालेत. अक्षरशः काळ्या रंगाचे थरच प्रदुषणामुळे या भागात साचलेले आहेत. मात्र तक्रारी करुनही अधिकारी काहीच हालचाली करत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणी नागरिकांनाच दोषी ठरवलं. प्रदूषण हा इथला गंभीर प्रश्न आहे हे वास्तवच आहे. मात्र ही समस्या सोडवण्यासाठी गरज आहे समन्वय, इच्छाशक्ती आणि उपाययोजनांची.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.