ठाणे : अंबरनाथमध्ये सहा जणांनी मायलेकिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेत ६ जणांपैकी काहींनी महिलेच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारांनी गंभीर दुखापत केली आणि मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी त्यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. जमिनीच्या वादातून मागील वर्षीदेखील या मायलेकींबरोबर असाच असाच जीवघेणा प्रकार घडला होता. पुष्पांजली सिंग आणि तिचया दहा वर्षांच्या मुलीवर रात्री साडेनऊच्या सुमारास त्या घरी जात असताना हा हल्ला करण्यात आला.
मागीलवर्षी देखील पुष्पांजलीला जबर मारहाण करण्यात आली होती आणि तिच्या मुलीला विवस्त्र करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.