www.24taas.com, मुंबई
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्या प्रकारे मतभेत समोर आले त्यावरून भाजपच्या नेतृत्वामध्ये पडलेली दरी आणखी वाढत असल्याचे समोर आले आहे. नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद दिल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी नाराज झाले आहेत. तर विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनीही रॅलीमध्ये सामील न होण्याचे संकेत दिले आहे.
अडवाणी नाराज झाल्यामुळे ते कार्यकारिणीच्या बैठकीला हजर राहिले नाहीत. आता गडकरी २०१५ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष म्हणून कायम राहणार असून त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१४च्या निवडणुका लढविल्या जाणार आहेत.
अडवाणींच्या नाराजीनंतर पक्षातील धुसफूस कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुप्पा यांनी भरून काढली. नरेंद्र मोदींच्या कामाचे स्वरूप पाहता त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषीत करावे, अशी मागणी केली आहे.
अडवाणी या रॅलीत सामिल होणार नसल्याचे अडवाणी यांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे नाराज सुषमा स्वराज केवळ काही काळासाठी पक्षाच्या रॅलीत सामील होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहेत. परंतु, त्याची सहभागाबाबत अजूनही अनिश्चितता आहे.