कृपाशंकर सिंहांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय

Updated: Feb 28, 2012, 10:07 PM IST

www.24taas.com

 

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कृपाशंकर सिंह हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आणि त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश गेल्याच आठवड्यात हायकोर्टानं दिले होते.

 

याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर कृपाशंकर यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुनही गच्छंती करण्यात आली होती. मात्र यासाठी मुंबई मनपा निवडणुकीतल्या अपयशाचं कारण देण्यात आलं होतं. कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँकांतल्या व्यवहारात अनियमितता असल्याप्रकरणी, त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. कृपांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगण्यात येतय.