www.24taas.com, मुंबई
नाशिकमध्ये महायुतीचाच महापौर होणार, असा दावा भाजपनं केला आहे. त्याचबरोबर भाजपनं मुंबईच्या महापौरपदावरचा दावाही कायम ठेवला आहे. महायुतीच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. त्यानंतर भाजपनं हा दावा केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे या बैठकीला उपस्थित होते. एक टर्म मुंबईचं महापौरपद भाजपला द्यावं या मागणीवरही या बैठकीत चर्चा झाली. नाशिकमध्ये मनसे आणि भाजप या दोघांमध्ये छुपा समझौता होत असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती.
ही बैठक पूर्वनियोजित असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र या बैठकीत मुंबई आणि ठाण्यातील महापौर निवडीवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय नाशिकच्या राजकीय स्थितीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. भाजपनं मुंबईच्या महापौरपदावर दावा केल्यानं या बैठकीला आणखीनच महत्व आलं आहे.