www.24taas.com, मुंबई
अरुण टिक्कू हत्येप्रकरणी आता आणखी एकाला अटक करण्यात आलीय स्टॉक ब्रोकर गौतम वोराला क्राईम ब्रांचनं अटक केली आहे.
विजय पालांडेला मदत केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विजय पालांडेला पोलीस कोठडीतून पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यापूर्वी मॉडेल विवेका बाबाजी हिच्या आत्महत्येप्रकरणी देखिल गोतमची चौकशी करण्यात आली होती. तसंच टिक्कू आणि करण कक्कड हत्येप्रकरणात अडकलेल्या सिमरन सूदशीही त्याचे संबंध होते, यातही त्याची चौकशी करण्यात आलीय. विजय पालांडे हा अरूण टिक्कू आणि करण कक्क़ड या दोन हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे.
संबंधित आखणी बातम्या
पोलिसांना चकवा दिलेला विजय पालांडे अटकेत
पोलिसांच्या कचाट्यातून खुनी पालांडे फरार