पाहा शेअरबाजारातील घडामोडी...

मुंबई शेअरबाजार १७ हजार ३९३ अंकावर खुला झाला. बाजार खुला होताच त्यात १५ अंशांची वाढ झाली आहे. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार २९७ अंशांवर खुला झाला.. निफ्टीमध्येही सुरूवातीलाच ७ अंशांची वाढ नोंदवण्यात आली.

Updated: Apr 23, 2012, 11:12 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई शेअरबाजार १७ हजार ३९३ अंकावर खुला झाला. बाजार खुला होताच त्यात १५ अंशांची वाढ झाली आहे.  तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार २९७ अंशांवर खुला झाला.. निफ्टीमध्येही सुरूवातीलाच ७ अंशांची वाढ नोंदवण्यात आली.

 

डॉलरच्या तुलनेत रूपया पुन्हा घसरला असून डॉलरची किंमत ५२.९ पोहचली आहे. दिवसभरातील शेअरबाजारातील घडामोडी आम्ही आपल्याला देतच राहू.तर शुक्रवारी मुंबई शेअरबाजार १७ हजार ४५५ सेन्सेक्सवर खुला झाला होता. त्यात ५४ अंशांची घट होती.

 

राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार ३१२ अंशांवर खुला झाला होता. निफ्टीमध्येही १९ अंशांची घट झाली होती. डॉलरच्या तुलनेत रूपया ५१ पूर्णांक १६ अंशावर उघडला होता. डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या किंमतीत शून्य पूर्णांक शून्य पंचवीस अंशांनी घसरण झालेली होती.