तोतया पोलीस पोलिसांच्या जाळ्यात

मुंबईत तोतया पोलिसांपासून गंडवल्या जाण्याचा घटनेत दिवसंदिवस वाढ होतं आहे. डी.एन.नगर परिसरात शुक्रावारी आणखीन एका वरिष्ठ नागरिकाला तोतया पोलीसांनी लुटलं. पण डी.एन. नगर पोलीसांचा सतर्कतेमुळे एका तोतया पोलीसाला अटक करण्यात यश आलं.

Updated: Nov 11, 2011, 05:45 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईत तोतया पोलिसांपासून गंडवल्या जाण्याचा घटनेत दिवसंदिवस वाढ होतं आहे. डी.एन.नगर परिसरात शुक्रावारी आणखीन एका वरिष्ठ नागरिकाला तोतया पोलीसांनी लुटलं. पण डी.एन. नगर पोलीसांचा सतर्कतेमुळे एका तोतया पोलीसाला अटक करण्यात यश आलं. तोतया पोलिसांचा ह्या टोळीतील इतर दोन सदस्यांचा शोध पोलीसांनी सुरु केला.

 

गुलाम हसन समीर शेख. हा आरोपी आता पर्यंत पोलीस म्हणून वावरत होता. पण आज हा तोतया पोलीस खऱ्या पोलिसांचा हाती लागला. तोतया पोलिसाच्या अंगावर खाकी वर्दी तर नव्हती पण पोलिसांन प्रमाणे हावभाव करून मुंबईकरांनकडून लाखों रुपयांचे दागिने लुटले. आरोपी गुलाम हसन समीर शेखने आपल्या दोन इतर साथीदारांसह मिळून तोतया पोलीसांची एक टोळी बनवली होती.

 

मुंबईच्या डीएन नगर भागात सकाळी मॉनिंग वॉकला जाणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना पुढे दंगल घडल्याच सांगून त्यांच्या अंगावरील दागिने काढायला सांगायचे. आणि हात चलाखी करून त्यांचे दागिने पळवायचे. या घटनेनं धडा घेत वरिष्ठ नागरिकांनी तोतया पोलिसांपासून सावध राहण्याचे आव्हान मुंबई पोलिसांनी केलं आहे.