झी २४ तास वेब टीम, मुंबई
विकासाच्या नावाखाली मुंबई महानगर पालिका पैशांची उधळण करत आहे. माहिम सबवे हेच त्याचे उत्तम उदाहरण. कोट्यावधी रुपये खर्चून हा सबवे तयार करण्यात आला मात्र चुकीच्या ठिकाणी बांधल्यामुळे जनतेने त्यांचा वापरच केला नाही त्यामुळे ३ वर्षे झालं हा सबवे नुसताच बांधून तयार आहे.
कोट्यावधी रुपये खर्चून सबवे तयार केला. अपंगासाठी २ हायड्रोलिक लिफ्टही लावण्यात आल्या. २००८ मध्ये तत्कालीन महापौराच्या हस्ते याचं उद्घाटनही झालं. मात्र सबवे एकच महिना खुला राहिला. त्यानंतर गेली ३ वर्षे हा सबवे बंदच आहे.
पाण्याच्या लाईन, आणि बांद्रा किल्ल्याकडे जाणारं भुयार लागल्याने माहिम चौकी पासून सबवे निघाला. प्रत्यक्षात हा रस्ता ओलांडणं सहज शक्य आहे. मात्र सबवेतुन हा रस्ता ओलांडण हे आधिक त्रासदायक. त्यामुळे पालिकेनं कशाला नाहक खर्च केला. असा सवाल सामान्य जनता करत आहे. कोट्यावधी रुपये खर्चुन तयार केलेला सबवे नुसताच पडुन राहिला. शिवाय त्याचे देखभाल करण्याचा खर्चही पालिका उचलू शकत नाही त्यामुळे आता या ठिकाणी फोटो गॅलरी उभारायचा विचार पालिका करत आहे.