स्टँप पेपर घोटाळाःविलासरावांना दिलासा

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनात आजकाल कभी खुशी कभी गम असे सुरू आहे. दोन्ही मुलांचे लग्न नंतर सुभाष घई यांना जमीन दिल्याचा ठपका असे आनंद दुःखाचे क्षण येत आहेत. त्यात आता तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना मुंबई सेशन कोर्टाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी विलासराव देशमुखांना सहआरोपी बनवण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

Updated: Feb 29, 2012, 06:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनात आजकाल कभी खुशी कभी गम असे सुरू आहे. दोन्ही मुलांचे लग्न नंतर सुभाष घई यांना जमीन दिल्याचा ठपका असे आनंद दुःखाचे क्षण येत आहेत. त्यात आता तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना मुंबई सेशन कोर्टाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी विलासराव देशमुखांना सहआरोपी बनवण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

रामरतन सोनी यांनी विलासराव देशमुख यांना तेलगी स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी सहआरोपी करण्यात यावे, अशी याचिका कोर्टात दाखल केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात अब्दुल करीम तेलगीसह रामरतन सोनी हेदेखील आरोपी आहेत. विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात तेलगीला स्टॅम्प परवाना मिळाला होता. त्यामुळे देशमुखांनाही सहआरोपी करण्यात यावं, अशी याचिका त्यांनी केली होती.