मुंबई : नोकरीची जाहिरातीत मराठी माणसाला डावलण्याचे कृत्य करणाऱ्या युनायटेड टीम एचआर कन्स्लटंट प्रा. लि. ला स्वाभिमान संघटनेने चांगलाच दणका दिला आहे.
मराठी व्देष्ट्या कंपनी विरूद्ध आंदोलन करून स्वाभिमान संघटनेने त्याची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर युनायटेड ग्रुपनं चूक कबूल करत स्वाभिमान संघटनेकडे पत्र लिहून माफी मागितली आहे. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे.
नेमकी काय होती जाहिरात
युनायटेड ग्रुप ही प्लेसमेंट एजन्सी असून मालाडमध्ये त्यांचे मुख्य कार्यालय आणि कांदिवलीत शाखा आहे. युनायटेडच्या www.teamhr.co.in या वेबसाईटवर जाहिरात देण्यात आली की, एका कंपनीसाठी मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह या पदासाठी तात्काळ भरती आहे. 27 जानेवारीला प्रसिध्द झालेल्या या जाहिरातीत मुंबईतील बॅग्ज आणि फुटवेअरच्या कंपनीसाठी ही भरती असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मात्र जाहिरातीत खटकणारी बाब म्हणजे केवळ अमराठी उमेदवारांनीच अर्ज करावा अशी अट घालण्यात आली होती.
ही बाब स्वाभिमान संघटनेच्या लक्षात येताच स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी युनायटेड ग्रुपच्या मालाड आणि कांदिवली येथील कार्यालयात स्वाभिमान आंदोलन केलं. या आंदोलनानंतर युनायटेड ग्रुपचे संस्थापक राज शेट्टी यांनी स्वाभिमान संघटनेची माफी मागितली. युनायटेडमधील कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षामुळे ही चूक झाली असल्याचं युनायटेड कंपनीनं कबूल केलं तसे पत्रही स्वाभिमान संघटनेकडे सुपूर्द केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.