मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जय्यत तयारी सुरु केलीये. यासाठी मुंबईतुनही रसद पुरवली जाणार आहे. यासाठी मुंबई भाजपने गोरेगाव इथे बिहार संकल्प रॅलीचे आयोजन केले होते. यासाठी बिहारचे केंद्रीय मंत्री आणि खासदार यांनी हजेरी लावली. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूढ़ी, शहानवाझ हुसैन, प्रसिद्ध अभिनेता आणि खासदार मनोज तिवारीसह अनेक भाजपाचे बिहारी नेते उपस्थित होते.
राज्यात 32 लाख तर एकटया मुंबईत तब्बल 17 लाखापेक्षा जास्त बिहारी जनता आहे. यापैकी अनेक जण हे मुंबई आणि महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत. असे असले तरी बिहारमध्ये मतदार यादीत नाव असलेले मुंबईत 8.5 लाखापेक्षा जास्त तर राज्यात एकूण 14 लाखापेक्षा जास्त मतदार आहेत.
तेव्हा याच मतदारांपर्यन्त पोहचण्यासाठी ख़ास करून मुंबई भाजपाने आणि त्यांच्या बिहार सेलने कंबर कसली आहे. मुंबईत कांदिवली, दहिसर, गोरेगाव, दिंडोशी, अंधेरी, मालाड-मालवणी, जोगेश्वरी, कुर्ला, धारावी, दादर, मलबार हिल, कुलाबासारख्या भागात बिहारी जनतेचे लक्षणीय वास्तव्य आहे. या बिहारी मतदारांपर्यन्त पोहचण्यासाठी मुंबई भाजपाने 1700 विशेष कार्यकर्त्यांची ख़ास फौज उभी केली आहे. हे कार्यकर्ते मुंबईतील या बिहारी पॉकेट्सपर्यन्त पोहचणार आहे.
बिहारचे मतदान हे वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे. तेव्हा बिहारमध्ये मुंबईतुन मतदार टप्प्याटप्प्याने कसे रेल्वेने पोहचतील याची काळजीही हे विशेष कार्यकर्ते घेणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.