मुंबई : मुंबई महापौरपद निवडणूक, राज्यातील राजकीय घडामोडी आणि त्याचा आगामी अर्थसंकल्पावर होणारा परिणाम याबाबत चर्चा करण्यासाठी आज रात्री उशिरा भाजपाच्या कोअर कमिटाची बैठक होत आहे.
शिवसेना-भाजपाच्या बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात शिवसेना काय भूमिका घेणार याबाबत अद्याप संभ्रम आहे. शिवसेनेने विरोधाची भूमिका घेतली अथवा पाठिंबा काढला तर अधिवेशन कसे चालवायचे, सरकारची रणनिती काय असावी याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
त्याचबरोबर मुंबई महापौर पदाची निवडणूक लढवायची का, लढवायची असल्यास संख्याबळ कसे जमा करायचे याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ मंत्री आणि नेते उपस्थित असणार आहेत.