मुंबई : मुंबईतल्या महागाड्या घरांमागे अधिकाऱ्यांची खाबूगिरी असल्याचा खळबळजनक आरोप आज भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केलाय.
एक नव्हे दोन नव्हे तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा स्वेअर फूट घोटाळ्याचा आरोप अमित साटम यांनी केलाय. बिल्डिंग प्रपोझल, डीपी, बिल्डिंग डिपार्टमेंट आणि एसआरए या चार विभागात अधिकाऱ्यांचे रॅकेट असल्याचा साटमांचा आरोप आहे.
मुंबई महापालिकेत 'ओएसडी' असणारे सुधीर नाईक हे घोटाळ्याचे मुख्य सूत्राधार असल्याचाही आरोप साटम यांनी केलाय. या प्रकरणातल्या संबंधित अधिकाऱ्यांची एसीबीमार्फत चौकशी करण्याची मागणी साटम यांनी केलीय. भ्रष्टाराला आळा बसला तर घरांच्या किंमती कमी होतील, असा दावाही साटम यांनी केलाय.
- स्क्वेअर फूट घोटाळा करणाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांचं रॅकेट
- बिल्डिंग प्रपोझल, डीपी, बिल्डिंग, एसआरए विभागात अधिकाऱ्यांचं रॅकेट
- मागील १५ वर्षं विशिष्ट अधिकारी या चार विभागांतच फिरले
- अंधेरी-वांद्रे विभागातील बांधकामासंदर्भातील ३,५०० फाईल्स गायब
- एका फाईलमागे ५ कोटींचा घोटाळा
- एकट्या अंधेरी-वांद्रे भागातच १८,५०० कोटींचा स्क्वेअर फूट घोटाळा
- एका स्क्वेअर फूटमागे १ ते ५ हजार रूपयांचा भ्रष्टाचार
- संपूर्ण मुंबईत ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार
- भ्रष्टाचार बंद झाला तर मुंबईतले फ्लॅट स्वस्त होतील
- ओएसडी सुधीर नाईक घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार
- सुधीर नाईक मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयात ओएसडी म्हणून कार्यरत
- महाले, संखे, अमोल दलाल, साखळकर, टांक, राव, राम धस अधिकारीही घोटाळ्यात सामील
- उपायुक्त राम धस महानगरपालिकेतले सर्वात श्रीमंत अधिकारी
- अधिकाऱ्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीमार्फत चौकशी करावी