अमित जोशीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईमध्ये विनोद तावडेंच्या निवासस्थानी आज झालेल्या चर्चेमध्ये भाजपानं 114 जागांची मागणी केलीये. मात्र शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य होण्याची शक्यता कमीच आहे. एखाद्या फॉर्म्युलावर एकमत झालंच, तरी पुढची वाटचालही अवघडच आहे. बघुयात याबाबतचा एक खास रिपोर्ट...
मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या युतीची चर्चा पुढे सरकलीये... विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या दोन बैठकांनंतर आता भाजपानं 114 जागांची मागणी केलीये.
महापालिकेतल्या एकूण 227 जागांपैकी 114 जागा भाजपाला हव्या आहेत... त्यामुळे शिवसेनेला उरणार 113 जागा. म्हणजे भाजपापेक्षा 1 जागा कमी.
2012च्या निवडणुकीत भाजपानं केवळ 63 जागा लढल्या होत्या. तर शिवसेनेनं तब्बल 135 जागांवर उमेदवार दिले होते.
मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची ताकद वाढलीये. भाजपाचा मुंबईत शिवसेनेपेक्षा 1 आमदार जास्त आहे. त्यामुळेच आता भाजपाला जागावाटपात जास्त हिस्सा हवाय. शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य होईल का, हा आता कळीचा प्रश्न आहे...
भाजपापेक्षा 1 जागा कमी स्वीकारणं हा एका अर्थी शिवसेनेचा नैतिक पराभव ठरेल. त्यामुळे हा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य होण्याची शक्यता जवळजवळ नाही...
भाजपाची वाढलेली ताकद लक्षात कमीत कमी 80 आणि जास्तीत जास्त 90 जागा सोडण्याची तयारी शिवसेनेनं केलीये...
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर १०५ जागांपर्यंत भाजपा तडजोड करेल, अशी शक्यता आहे....
त्यामुळे अखेरीस १२२-१०५ फॉर्म्युल्यावर युतीचं गणित जमू शकतं...
मात्र बोलणं सोपं करणं अवघड अशी युतीची सध्यातरी स्थिती आहे... कारण
आकड्यांवर एकमत झालं तरी वॉर्डनिहाय वाटप करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे...
शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या अनेक वॉर्डमध्ये भाजपा दावा करण्याची शक्यता
मुंबई उपनगरांमध्ये भाजपची जास्त जागांची मागणी शिवसेनेसाठी अडचणीची ठरू शकते...
गुजराती, उत्तर भारतीय व्होट बँकेबरोबरच मराठी बहुल भागावरही भाजपाचा डोळा आहे...
आरपीआयला कुणाच्या कोट्यातून किती जागा सोडायच्या याचा तिढा अद्याप कायम आहे...
युती झाली तरी सततच्या भांडणांमुळे कार्यकर्त्यांचं मनोमीलन कठीण आहे...
सिंगल लार्जेस्ट पार्टी राहण्यासाठी युतीतच पाडापाडीचं राजकारण होण्याची शक्यता अधिक आहे...
एकूण काय तर शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चेची गाडी थोडी पुढे सरकली असली तरी अद्याप बरेच सिग्नल आहेत... बरीच लेव्हल क्रॉसिंग पार करायचेत... आणि बरीच स्थानकंही गाठायची आहेत...