मुंबई : शिवसेनेच्या 'गर्विष्ठ' पोस्टरबाजीवर भाजप नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही सहन करतोय, योग्यवेळी निर्णय घेऊ, असे बापट म्हणालेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील वाद टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : बाळासाहेबांसमोर मान झुकवणाऱ्या मोदींचे वादग्रस्त पोस्टर हटविले
शिवसेनेने भाजपला सहन केलं की नाही ते माहीत नाही. मात्र, सत्ता टीकवायची आहे म्हणून आम्ही सहन करत आहोत, अशी प्रतिक्रिया बापट यांनी दिलीय. योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचा इशारा बापट यांनी शिवसेनेला दिलाय.
अधिक वाचा : पाकिस्तानच्या मलालाचे भारतात स्वागत होईल : शिवसेना
शिवसेनेने सेना भवनच्या परिसरात भाजपावर थेट टीका करणारे पोस्टर लावले आहेत. 'विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी, झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना साहेबांच्या चरणी..' अशा प्रकारची पोस्टरबाजी शिवसेनेने केली होती. या पोस्टरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी यांच्यापासून ते शरद पवार, राज ठाकरे, नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीचे फोटो लावण्यात आले होते.
अधिक वाचा : कोयना अवजलावरून शिवसेनेतच दोन गट
दम्यान, शिवसेना भवनसमोरील हे पोस्टर अधिकृत नाही, शिवसेनेची ती भूमिका नाही. कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात ते पोस्टर लावले असेल, यावर कृपया आणखी चर्चा करू नये, स्पष्टीकरण प्रसिद्धीप्रमुख हर्षल प्रधान यांनी केलेय. पोस्टरवरून रंगलेल्या वादानंतर शिवसेनेने स्पष्टीकरण केल्यानंतर भाजप नेते आणि मंत्री गिरीश बापट यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिल्यानंतर वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.