मुंबई महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने अखेर सरकार स्थापन केले. परंतु, निवडणुकीपूर्वी ज्या घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करणारे भाजप नेते त्यांना जेलमध्ये पाठविणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा या सारख्या घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता आवाजी मतदानाने हा विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रात पुढील ६ महिन्यासाठी सरकार पक्क झालं आहे. त्यामुळे आता भाजप कोणती कारवाई करतं याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
नॅशनल करप्ट पार्टी अशी संभावना निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्या करप्शन पार्टीला जेल पाठवतील का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी तटस्थ राहून एक प्रकारे भाजपला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याच्या आधारावर भाजप सरकार तरून जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.