'सबके घर टीव्ही हो' म्हणत त्यानं जीवन संपवलं

 घरात टीव्ही नाही म्हणून एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडलीय. 

Updated: May 13, 2015, 10:33 AM IST
'सबके घर टीव्ही हो' म्हणत त्यानं जीवन संपवलं title=

मुंबई :  घरात टीव्ही नाही म्हणून एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडलीय. 

आत्महत्येपूर्वी या मुलानं सुसाई़ड नोट लिहून आपल्या आत्महत्येमागचं कारणही सांगितलंय. तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळालीय.

मुलुंडच्या शिल्पा देवी मंदिर परिसरात रोहन पटेल हा १६ वर्षांचा मुलगा आपली आई आणि भावासोबत राहत होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं घरी टीव्ही विकत घेणं त्यांना शक्य होत नव्हतं. मात्र, टीव्ही नसल्याच्या क्षुल्लक कारणानं त्यानं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. 

त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या. एकात गरीबी आणि टीव्ही असं लिहिलंय  तर दुसऱ्या चिठ्ठीत 'सबके घर टीव्ही हो' असं लिहिलंय. याबाबत मुलुंड पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.