इक्बाल कासकर खंडणी प्रकरणात दाऊदचाही समावेश?

या प्रकरणात आता दाऊदचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे दाऊद गँग पुन्हा एकदा मुंबईत सक्रीय झालीय का? असा प्रश्न निर्माण झालाय. 

Updated: Feb 5, 2015, 11:01 AM IST
इक्बाल कासकर खंडणी प्रकरणात दाऊदचाही समावेश? title=

मुंबई : एका रिअल स्टेट एजेंटकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ६ फेब्रवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळालीय. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात आता दाऊदचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे दाऊद गँग पुन्हा एकदा मुंबईत सक्रीय झालीय का? असा प्रश्न निर्माण झालाय. 

एका रिअल स्टेट एजंटकडे तीन लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला जे जे मार्ग पोलिसांनी अटक केली आणि पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली. एव्हढंच नाही तर आता या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची झोप उडालीये. कारण या खंडणी प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ही समावेश असल्याचा पोलीसांना संशय आहे. शिवडी कोर्टात इक्बाल कासकर याला हजर करताना मुंबई पोलिसांनी दाऊद इब्राहिमचा या खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केलाय. पण हे सर्व आरोप खोटे आहेत असं इक्बाल कासकरने कोर्टात सांगितले.
 
पोलिसांनी कासकरची कोठडी मागण्यासाठी काय कारणे दिली ती पाहूयात....
- या प्रकरणात दाऊद इब्राहिमचा संबंध आहे का?
- तक्रारदाराला ज्या गाडीतून उचलून इक्बाल कासकरच्या घरी आणले होते ती गाडी ताब्यात घेणे आहे
- इक्बाल कासकर याच्या आणखी एका साथीदाराला अटक करणे आहे
- इक्बाल कासकरने दाऊदच्या मदतीने खंडणी आणि धमकीसारखे आणखी गुन्हे केले आहेत का याबाबात तपास करणे आहे.

 या खंडणी प्रकरणात  दाऊदचे नाव घेण्याचे दोन कारणं सांगितली जातायेत. दाऊदचे या प्रकरणात नाव घेऊन हे प्रकरण अंडरवर्ल्ड जगताशी जोडण्याचा प्रयत्न असावा तर दुसरे कारण म्हणजे पाकिस्तानात लपलेल्या दाऊद इब्राहीमवर आणखी एका प्रकरणाचा फास टाकण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.