मुंबई : बेस्टचा आर्थिक डोलारा सांभाळून पूर्वपदावर आणण्यासाठी बेस्ट प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. यासंदर्भातील कृती आराखडा बेस्टने पालिका गटनेत्यांच्या बैठकीत सादर केला. आर्थिक शिस्त लावण्यासाठी खर्च कमी करणारे अनेक कटू निर्णय या कृती आराखड्यात समाविष्ट आहेत.
कर्मचारी अधिका-यांचे भत्ते बंद करणे, नवा वेतन करार लांबणीवर टाकणे, एसी बसेस बंद करणे. यासह वायफळ खर्च कमी करण्यासंदर्भातील अनेक गोष्टी केल्यास महिन्याला ५० कोटींहून अधिक रकमेची बचत होणार आहे.
परंतु पालिका आयुक्त अजोय मेहतांनी या कृती आराखड्यातील तरतुदींना बेस्ट समितीची मंजूरी घ्या, त्यानंतर आर्थिक मदत देण्यास सहमती दर्शवली. पालिका मदतीसाठी तयार आहे, परंतु बेस्टला आर्थिक शिस्त येणे गरजेची असल्याचं मत सर्वांनी नोंदवले.