मुंबई : मुंबईतील अकरावी प्रवेशासाठीची पहिली कट ऑफ यादी गुरुवारी जाहीर झालीय.
एरव्हीच्या नामांकित कॉलेजेसना मागे टाकत वाशीच्या ‘फादर एग्नेल मल्टीपर्पज ज्युनिअर कॉलेज’ आणि ठाण्याच्या ‘सरस्वती विद्यालय ज्युनिअर कॉलेज’नं बाजी मारलीय. तिथल्या सायन्सची कट ऑफ यादी अनुक्रमे 94.8 टक्के आणि 94 टक्क्यांवर बंद झालीय. त्यापाठोपाठ विलेपार्ल्याच्या साठ्ये कॉलेजचा आणि डी. जी. रूपारेल कॉलेजचा नंबर लागलाय. साठ्येमध्ये 93.2 टक्क्यांना आणि रूपारेलमध्ये 93 टक्क्यांना विज्ञान शाखेतील प्रवेश बंद झालेत.
अकरावीची कट-ऑफ यादी -
विज्ञान शाखा | कट ऑफ % |
फादर एग्नेल ज्युनिअर कॉलेज | 94.8 % |
सरस्वती विद्यालय ज्यु. कॉलेज | 94 % |
साठ्ये कॉलेज | 93.2 % |
रूपारेल कॉलेज | 93 % |
रूईया कॉलेज | 93 % |
वाणिज्य शाखा | कट ऑफ % |
एन एम कॉलेज | 93.4 % |
पोद्दार कॉलेज | 92 % |
एच आर कॉलेज | 91.8 % |
कला शाखा | कट ऑफ % |
सेंट झेवियर्स कॉलेज | 93 % |
जयहिंद कॉलेज | 86.4 % |
हिंदुजा कॉलेज | 85.2 % |
रूईया कॉलेज (मराठी) | 90.2 % |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.