मुंबई : मुंबईत आणखी ९ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत रेल्वेच्या विविध सुविधा, योजनांचं लोकार्पण १८ डिसेंबर रोजी करण्यात आलं. या वाय-फायचा स्पीड 1GBps असेल.
१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
२) भायखळा
३) कुर्ला
४) वाशी
५) बेलापूर
६) ठाणे
७) बोरिवली
८) अंधेरी
९) पनवेल
'मोफत वाय-फाय सुविधा हे त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे', असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया'चं स्वप्न साकार करण्यासाठी रेल्वेमंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत.
शिवाय, २०१६ च्या अखेरपर्यंत एकूण १०० रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा देण्याचं आश्वासनही पूर्ण करु, असेही प्रभू यांनी यावेळी सांगितले.