गीत रामायणाला ६० वर्षं, जादू कायम

गीत रामायणाला ६० वर्षं पूर्ण झाली. साठ वर्षांनंतरही गीत रामायणाचं रसिकांवर गारूड कायम आहे. गदिमा आणि संगीतसूर्य सुधीर फडकेंच्या प्रतिभेचा अलौकिक कलाविष्कार यातून दिसून येत आहे.

Updated: Mar 28, 2015, 09:13 AM IST
गीत रामायणाला ६० वर्षं, जादू कायम title=

मुंबई : गीत रामायणाला ६० वर्षं पूर्ण झाली. साठ वर्षांनंतरही गीत रामायणाचं रसिकांवर गारूड कायम आहे. गदिमा आणि संगीतसूर्य सुधीर फडकेंच्या प्रतिभेचा अलौकिक कलाविष्कार यातून दिसून येत आहे.

गीत रामायण. साठ वर्षे उलटली तरी गीतरामायणाचं गारुड कायम आहे. गीत रामायण म्हणजे आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगुळकर उर्फ गदिमा आणि संगीतसूर्य सुधीर फडके उर्फ बाबुजी यांच्या प्रतिभेचा अलौकिक कलाविष्कार. 1 एप्रिल 1955 ला रामनवमीच्या दिवशी पुणे आकाशवाणीवर पहिलं गीत सादर झालं.

बघता बघता गीतरामायण मराठी माणसाच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलं. काळ बदलला... पिढ्या  बदलल्या... मात्र अविट गो़डीच्या गीतरामायणाची लोकप्रियता कमी झाली नाही. गीत रामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी तेलगु, मल्याळी, संस्कृती, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.