मुंबई : खाजगी कंपन्यांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 'ग्रॅच्युइटी' गमावण्याची चिंता करावी लागणार नाही. कारण, लवकरच ग्रॅच्युइटीसाठी असलेली पाच वर्षांची बंदी उठवली जाऊ शकते. तसंच महिला कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळू शकते.
अधिक वाचा - सातवा वेतन आयोग, ...तर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही!
भारतातल्या कर्मचारी वर्गाला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं भारत सरकार काही महत्त्वाची पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. यासाठी कामगार कायद्यात काही बदल होऊ शकतात.
अधिक वाचा - तुम्ही लग्न करताय, आधी करार करा नंतर विवाह!
सूत्रांच्या माहितीनुसार, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व देशात उद्योग-व्यापाराला चालना देण्यासाठी सरकार काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रॅच्युइटीमध्ये असलेली पाच वर्षांची सक्ती उठवली जाऊ शकते. ही ग्रॅच्युइटी पोर्टेबल होऊ शकते. तसेच महिला कर्मचाऱ्यांना बाळंतपणासाठी सहा महिन्यांची सुट्टी दिली जाऊ शकते.
अधिक वाचा - खुशखबर : सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३.५ टक्के वाढीचा प्रस्ताव
आज, या विषयावर सरकार, उद्योग आणि कर्मचारी संगटना यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.