मुंबई : देशभरात सहिष्णू आणि असहिष्णूचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनेक साहित्यिक, कलाकार यांनी देखील या वादात उडी घेतली. पण आता नटसम्राटाने देखील या वादात उडी घेतली आहे.
कायम परखड मत व्यक्त करणारे नाना पाटेकर यांनी देखील या देशातील परिस्थितीवर आपलं मत मांडले आहे. 'आपला देश जगातील सर्वात सहिष्णू देश आहे. भारतासारखी माणसे या जगात कुठेही भेटणार नाहीत'. असं नाना पाटेकर यांनी ठामपणे म्हटलं आहे.
शनिशिंगणापूरच्या वादासंदर्भात नाना पाटेकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. 'सर्वांना सर्व ठिकाणी जावून प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये पुरुष आणि स्त्री असा भेद करता कामा नये'. मी स्त्री-पुरुष भेद मानत नसल्याचेही नाना पाटेकरांनी म्हटलं आहे.