मुंबई : स्टेट बँकेच्या नेतृत्तवात 7 डिसेंबरला किंग फिशर एअरलाईन्सच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे... या लिलावाद्वारे आठ हजार कोटीं रुपये वसुल करण्यात येणार आहेत.
विजय माल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सवर विविध बँकांचे आठ हजार कोटींचं कर्ज आहे. जानेवारी 2013 पासून या कर्जाची परतफेड करण्यात आली नव्हती त्यामुळे या कर्ज वसुलीसाठी हे पाऊल उचलण्यात आलंय.
लिलाव होणा-या संपत्तीत मुंबईतील किंग फिशर हाऊस आणि गोव्यातील किंगफीशर व्हिला यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.