इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ

 आता करदात्यांसाठी खुषखबर. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी सरकारनं मुदतवाढ दिलीय. आता सात सप्टेंबरपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार आहे.

Updated: Sep 2, 2015, 07:39 PM IST
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ title=

मुंबई : आता करदात्यांसाठी खुषखबर. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी सरकारनं मुदतवाढ दिलीय. आता सात सप्टेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार आहे.

सुरूवातीला ३१ ऑगस्ट ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अखेर मुदत होती. मात्र करदात्यांना आणखी पाच दिवसांची मुदतवाढ मिळाल्यामुळं रिटर्न फाईल करता येणार आहे.

दरवर्षी ३१ जुलै ही अखेरची मुदत असते. त्यानंतर सरकार महिनाभराची मुदत वाढवून देत असते. मात्र यंदा सरकारनं आधीपासूनच ३१ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.