५ आठवड्यात तब्बल १४२ किलो वजन घटवलं

इमानचे सध्या वजन ५०० किलोवरुन ३५८ किलो झाले आहे. जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून इमान अहमद ओळखली जात होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 19, 2017, 12:43 PM IST
५ आठवड्यात तब्बल १४२ किलो वजन घटवलं title=

मुंबई : इजिप्तच्या इमान अहमदने पाच आठवड्यात तब्बल १४२ किलो वजन घटवलंय. इमानचे सध्या वजन ५०० किलोवरुन ३५८ किलो झाले आहे. जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून इमान अहमद ओळखली जात होती.

इमान अहमदचं जेव्हा भारतात आगमन झालं, त्यावेळी तिचं वजन तब्बल ५०० किलो होतं. पण डॉक्टर मुफ्फजल लकडावाला लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तब्बल १४२ किलो वजन घटवलं आहे. इमानवर डॉक्टर मुफ्फजल लकडावाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

 इजिप्तला गेल्यानंतरही तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली. इमानवरील पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर ती इजिप्तला परतणार आहे.

इमान अहमदवर ७  मार्च रोजी वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण या शस्त्रक्रियेपूर्वीत तिनं डाएट आणि औषधोपचारामुळे अवघ्या महिनाभरातच १०० किलो वजन घटवलं होतं. आता पुन्हा डाएट आणि औषोधोपचाराद्वारे एकूण १४२ किलो वजन घटवण्यात आलं आहे.