मुंबई : महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय़ घेतलाय. मात्र राज्यातल्या तीन आमदारांनी ही वाढ नाकारलीये.
अमरावतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी ही वेतनवाढ नाकारली. त्यानंतर विधानपरिषद आमदार विक्रम काळे आणि सुधीर तांबे यांनी वेतनवाढ नाकारलीये.
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पत्र लिहून वेतनवाढ स्वीकारणार नसल्याचं कळवलं. शिक्षकांना नीट पगार मिळत नसल्याने त्यांनी ही पगार वाढ नाकारलीये.
विनावेतन शिक्षकांना सरकारकडून वेतन मिळाल्यास वेतनवाढ स्वीकारणार असल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे.