सुपारी फुटत नाही, म्हणून नवरीही नटत नाही

महायुतीच्या आजच्या बैठकीतही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. येत्या आठवडाभरात चर्चा करून जागावाटपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

Updated: Jul 28, 2014, 07:43 PM IST
सुपारी फुटत नाही, म्हणून नवरीही नटत नाही title=

मुंबई : महायुतीच्या आजच्या बैठकीतही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. येत्या आठवडाभरात चर्चा करून जागावाटपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

हा तिढा कायम असल्याने कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना कामाला लागता येत नाहीय, एकंदरीत जागा वाटपाची सुपारी फुटत नाही, आणि इच्छुकांना तयारीला लागता येत नाही.

जागांच्या मागणीसंदर्भात फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे किमान 20 जागांची मागणी रिपाईच्या रामदास आठवलेंनी केलीय.

महायुतीच्या नेत्यांकडे आपण 40-42 जागांची यादी दिली आहे. यातल्या किमान 20 जागा आपल्याला मिळाव्यात, असा आठवलेंचा आग्रह आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशामुळं भाजपनं यापूर्वीच निम्म्यां जागांची मागणी केली आहे. त्यातच आता महायुतीतल्या इतर छोट्या घटकपक्षांनीही आक्रमक होत एकूण १३० जागांची मागणी केली आहे, त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी भाजप आणि शिवसेनेत पहिली बैठक झाली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.