मुंबईत बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ७ महिन्यांची गरोदर

रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतील उपनगरातील विक्रोळी भागात घडली आहे. एका नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

Updated: Oct 24, 2015, 02:38 PM IST
मुंबईत बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ७ महिन्यांची गरोदर title=

मुंबई : रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतील उपनगरातील विक्रोळी भागात घडली आहे. एका नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

हा निष्ठूर बाप तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. धक्कादायक बाब  ध्कादायक म्हणजे ही अल्पवयीन मुलगी ७ महिन्यांनी गरोदर आहे . विक्रोळी पार्क साईट पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली. त्याला सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

पत्नी घरकामासाठी गेल्यावर हा नराधम बाप वेळोवेळी मुलीवर अत्याचार करायचा. जर याबाबत कोणाला सांगितलेस तर मी आत्महत्या करीन अशी धमकी तो मुलीला द्यायचा. मुलीला एके दिवशी अस्वस्थ वाटू लागल्यावर तिची आरोग्य तापसणी केली असता ती गरोदर असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. याची माहिती एका अनोळखी व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानंतर अधिक चौकशी करता हा प्रकार उघडकीस आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.