मुंबई : तुर्की एअरलाइन्समध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरण्यात आली होती. आता एअर इंडियाला ISISने धमकीचा फोन केलाय. एअर इंडियाचे विमानाचे अपहरण करुन उडवू देण्याचे ISISने म्हटलेय.
एअर इंडियाच्या कॉल सेंटरला ISISचा हा धमकीचा फोन आला. २८ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानानाचे अपहरण करण्यात येईल, अशीच धमकी दिली गेली आहे. दरम्यान, रविवारी न्यूयॉर्क ते इस्तांबुलला जाणाऱ्या तुर्कि एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्यानंतर अमेरिकेने हॅलिफॅक्स एअरपोर्टवर विमानाचे इमरजेंसी लॅंडिंग करण्यात आले.
ISISची धमकी मिळाल्यानंतर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जगातील एअरलाइन्सच्या कार्यालयात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर बॅंकॉक ते इस्तांबुलला जाणारे तुर्कि एअरलाइन्सचे विमान दिल्लीत उतरविण्यात आले होते. मात्र, ती बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.