मुंबई : सामान्य जनता टोल भरते मात्र टोलमधून सूट मिळालेल्या आमदारांना साधं ओळखपत्र दाखवायलाही लाज वाटते.
टोल नाक्यावर टोल आकारणीतून सूट मिळण्यासाठी लोकप्रतिनिधिंकडे ओळखपत्र मागितलं जातं... हीच बाब खटकत असल्याचा मुद्दा आमदारांनी विधान परिषदेत उपस्थित केला.
लोकप्रतिनिधींना टोल भरण्यापासून सूट मिळतेच... पणं आता ओळखपत्र दाखवण्यातूनही मुक्ती मिळावी, अशी अजब मागणी आमदारांनी केली.
आणि धक्कादायक म्हणजे, यावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोल कंत्राटदारांना कडक शब्दांत समज देणार असल्याचं आश्वासनही देऊन टाकलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.