www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय दुतावासातील वरिष्ठ महिला अधिकारी देवयानी खोब्रागडे यांचा अमेरिकेत झालेल्या अपमानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणा करण्यात आल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज जाळून अमेरिकाविरोधात घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला. देवयानीला न्याय मिळालाच पाहिजे, अमेरिकेने माफी मागितली पाहिजे आणि त्यासठी भारत सरकारने अमेरिकेवर दबाव टाकावा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.
दरम्यान, देवयानी खोब्रागडेंना वाईट वागणूक देणा-या अमेरिकन यंत्रणांवरचा राग आता अमेरिकन कंपन्यांवर निघू लागलाय. वांद्रे इथं रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी डॉमिनोजच्या पिझ्झा पार्लरमध्ये हंगामा करून तोडफोड केली. अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी डॉमिनोजमध्ये धिंगाणी घातला.
देवयानी खोब्रागडे प्रकरणी अमेरिकेची अडेलतट्टूपणाची भूमिका कायम आहे. देवयानी यांना अमेरिकेत मिळालेल्या वागणुकीबाबत अमेरिकन प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केली असली तरी माफी मागणार नाही किंवा खटलाही मागे घेणार नाही अशी भूमिका अमेरिकेने घेतलीय. त्यामुळं हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी अमेरिकेने गुरुवारी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र ती पुरेशी नसल्याची प्रतिक्रिया देशात उमटली आहे. केवळ दिलगिरी नको, तर अमेरिकेनं बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय वाणिज्यमंत्री कमलनाथ यांनी केलीये.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.