महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायम, हायकोर्टाने याचिका फेटाळली

बकरी ईद करता २५, २६ आणि २७ सप्टेंबर या तीन दिवशी गोवंश हत्या आणि विक्रीकरता परवानगी द्यावी अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलीये. 

Updated: Sep 21, 2015, 06:35 PM IST
महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायम, हायकोर्टाने याचिका फेटाळली title=

मुंबई : बकरी ईद करता २५, २६ आणि २७ सप्टेंबर या तीन दिवशी गोवंश हत्या आणि विक्रीकरता परवानगी द्यावी अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलीये. 

राज्य सरकारांने गोवंश हत्या आणि विक्रीवर बंदी घातलीये ही बंदी बकरीईद दरम्यान तीन दिवसांकरता उठवावी अशी मागणी करणारी याचिका आमिन इंद्रीसी यांनी केली होती.

गोवंश हत्या अणि विक्रीबाबत राज्य सरकारने कायदे केले आहेत आणि तेच लागू राहतील याबाबत न्यायालसाने आधीही आदेश दिले होते. त्यामुळे याबाबत दाद मागायची असेल तर राज्य सरकारकडे मागावी असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे बकरी ईद दरम्यान देखील गोवंश हत्येवर बंदी कायम असणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.