मुंबई : लोकल ट्रेनचे ३ डबे अंगावरून गेले तर काय होईल? विचारही करवत नाही ना. पण मुंबईत असा एक इसम आहे ज्याच्या अंगावरून लोकल ट्रेनचे ३ डबे गेले पण त्याला काहीही झालं नाही.
ही घटना घडलीय मस्जीद बंदर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर. स्टेरन सुरू झाली आणि अचानक एका इसमानं रेल्वे रुळावर उडी घेतली. मोटरमननं प्रसंगावधान राखत ब्रेक दाबले पण तोवर इसमाच्या अंगावरून ३ डबे गेले होते. तात्काळ धावपळ सुरू झाली.
ट्रेनखाली नेमकी काय अवस्था आहे याची तपासणी सुरू झाली. त्या इसमाला ट्रेनखालून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तो इसम या सर्व लोकांच्या अंगावर दगड फेकायला लागला. अखेर एक रेल्वे कर्मचारी हेल्मेट आणि सेफ्टी जॅकेट घालून ट्रेन खाली गेला आणि त्या इसमाला खेचून बाहेर काढले. त्या इसमाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असल्यानंच त्यानं ट्रेन खाली अशा पद्धतीने उडी घेतल्याचं रेल्वे प्रशासनान सांगितलंय.