मोदींचे ४ ऑक्टोबरला चार कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर असून ते चार कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 

Updated: Sep 22, 2015, 11:47 PM IST
मोदींचे ४ ऑक्टोबरला चार कार्यक्रम  title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर असून ते चार कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 

यात आंबेडकर स्मारक याचे भूमिपूजन, रंगशारदा इथल्या मैदानावर या भूमिपूजनबाबत सभा, 
गोरेगाव इथल्या NSE मैदानावर 2 मेट्रो यांचे भुमिपूजन आणि JNPT चा एक कार्यक्रम आहे. 

आंबेडकर स्मारक बद्दलचे काही मुद्दे

- बाबासाहेब आंबेडकरांचा सुमारे 40 फुटी ब्राँझचा पुतळा असेल

- हे हरित स्मारक असेल

- इंदू मिलमधील एकही झाड तोडलं जाणार नाही

- डिजीटल व्हर्चुअल म्युझियमही असेल

- सर्वभाषिक पुस्तकांची लायब्ररी असणार

- 400 पेक्षा जास्त गाड्यांची पार्किंगची सुविधा असेल

- जास्तीत जास्त मोकळी जागा ठेवणार

- 12 हेक्टर जागेवर सुमारे अडीच लाख स्क्वेअर फुटचे बांधकाम असेल

- इंदू मिलमधल्या दोन तलावांचेही जतन केले जाणार

- देशातील सर्वोत्तम स्मारक असेल

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.