www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सत्यपाल सिंह यांनी भाजपच्या मेरठ इथल्या रॅलीत कमळ हाती धरल्यामुळे मुंबई सध्या पोलिस आयुक्ताविना आहे.
सत्यपालसिंह यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर अजून कोणाचाही नियुक्ती झालेली नाही. गेले पाच दिवस हे पद रिक्तच आहे.
विशेष म्हणजे या आयुक्तपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची माहिती आहे.
राजकीय मतभेदांमुळे महत्त्वाचे निर्णय रखडतात हे आपण अनेकवेळा पाहीलंय त्याचंच हे उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या एका गटाचा पाठींबा अहमद जावेद यांना आहे तर काँग्रेसच्याच दुस-या गटाचा पाठींबा विजय कांबळे यांना आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा अहमद आणि कांबळे या दोघांच्या नियुक्तीला विरोध आहे. सर्व्हीस सिनियॉरिटीनुसार विचार केला तर विजय कांबळे आणि जावेद अहमद यांची नावं आघाडीवर आहेत.
मात्र के. पी. रघुवंशी आणि राकेश मारिया यांचीही या जागेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. राकेश मारिया यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.