राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणाची होणार चौकशी

'रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्या तर जाळून टाका' असं चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणाची आता चौकशी होणार आहे. स्थानिक पोलिसांनी याबाबत हालचाली सुरू झाल्यात. 

Updated: Mar 10, 2016, 12:06 AM IST
राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणाची होणार चौकशी title=

मुंबई : 'रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्या तर जाळून टाका' असं चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणाची आता चौकशी होणार आहे. स्थानिक पोलिसांनी याबाबत हालचाली सुरू झाल्यात. 

सायन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी षण्मुखानंदमधल्या राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी सुरू केलीय. या भाषणात आक्षेपार्ह विधानं आढळल्यास राज ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 

राज ठाकरेंच्या भाषणातून मराठी भाषिकांचा पुन्हा एकदा मुद्दा मनसेच्या अजेंड्यावर असल्याचं दिसतंय. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना हिंसक आदेश दिल्याचा आरोप केला जातोय.   

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या दहाव्या वर्धापनाचं निमित्त साधून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उकरून काढलाय. नवीन रिक्षांचे ७० टक्के परवाने परप्रांतियांना देण्याचा घाट घातला जातोय...त्यामुळं नव्या रिक्षा दिसल्या तर त्या जाळून टाका असं वक्तव्य राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केलंय.