Kho Kho World Cup: इराणवर दमदार विजय मिळवत भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

Kho Kho World Cup 2025:  खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश गटसाखळी फेरीत भारताने आधी दक्षिण कोरिया आणि नंतर इराणवर रोमहर्षक विजय मिळवला.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 16, 2025, 09:26 AM IST
Kho Kho World Cup: इराणवर दमदार विजय मिळवत भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक  title=
Photo Credit: Instagram

India won Against Iran Kho-Kho World Cup Womens: खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत महिला संघाचेही सामने सुरु आहेत. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या जागतिक स्पर्धेत भारतीय महिला संघाने दक्षिण कोरिया आणि इराण (Team India vs Iran) या संघावर एकतर्फी विजयाची नोंद करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सलग दोन विजयामुळे गटात अव्वल स्थान मिळवले आहे. 

इराण विरुद्धचा सामना 

इराण विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने आपली आक्रमकता दाखवून दिली. टीम इराण संघावर 100-16 असा एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघाने इराणची पहिली तुकडी केवळ 33 सेकंदात गार केली. अश्विनीच्या नेतृत्वाखाली आणि मिनूने आक्रमता कायम ठेवल्यामुळे पहिल्या सत्राअखेर भारतीय महिला संघाने गुणांचे अर्धशतक नोंदवले होते. 

हे ही वाचा: पीसीबी पाहत आहे रोहित शर्माची वाट, हिटमॅन जाणार पाकिस्तानला! टीम इंडियाही जाणार का?

 

चारही सत्रांमध्ये उत्तम कामगिरी 

भारतीय महिला संघाची ही चारही सत्रांमध्ये अशीच कायम राहिली. त्यातही भारतीय महिला संघाच्या पहिल्या तुकडीने तिसऱ्या सत्रात नोंदवलेल्या 6मिनिटे 8 सेकंदाच्या अफलातून बचावामुळे भारतीय महिला संघाच्या एकतर्फी विजयाची निश्चिती झाली. निर्मलाचे कल्पक डावपेच आणि कर्णधार पुण्याची प्रियांका इंगळे यांच्या बरोबरच निर्मला भाती, नसरीन यांच्या अष्टपैलू कामगीरीमुळे भारतीय महिला संघाने विजेतेपदासाठी आपणच दावेदार असल्याचे दाखुवन दिले. 

हे ही वाचा: खो खो विश्वचषक स्पर्धेत पेरू संघाचा 70-38 असा पराभव, भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित!

 

तत्पूर्वी, याआधीच्या लढतीत भारतीय महिला संघाने दक्षिण कोरिया संघाचा 175-18 असा धुव्वा उडविला. 

 

हे ही वाचा: वयाच्या 48 व्या वर्षी 22 वर्षांच्या मुलीशी दुसरे लग्न, पत्नीने स्वीकारला इस्लाम; लोक संतापले

इतर पारितोषिके 

  • सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू: मोबिना 
  • सर्वोत्कृष्ट बचावपटू: मिनू 
  • सामनावीर : प्रियांका इंगळे