नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस : शिवसेना नेते परब

शिवसेनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 15, 2017, 03:00 PM IST
नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस : शिवसेना नेते परब title=

मुंबई : शिवसेनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधले आहे. नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

केंद्र आणि राज्यातल्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना भाजपमधले ताणलेले संबंध निवळायचं नाव घेण्याचं दिसत नाही आहे. आरोपप्रत्त्यारोपांच्या मालिकेत आता शिवसेनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधलंय. नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप, शिवसेना नेते अनिल परब यांनी केलाय.

रस्ता डांबरीकरण, पाणी शुद्धीकरण यातल्या भ्रष्टाचाराचं हे प्रकरण आहे. नागपूर पालिका घोटाळा प्रकरणी २७ फेब्रुवारी २००१ ला नंदलाल समितीने अहवाल दिला. त्या अहवालात नंदलाल समितीनं देवेंद्र फडणवीसांवर ठपका ठेवल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय. या घोटाळ्याविरोधात शिवसेना आवाज उठवणार असल्याचं अनिल परब यांनी म्हंटले आहे. 

नंदलाल समितीने आपल्या अहवालात फडवणीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस नंदलाल समितीने केल्याचं परब यांनी म्हंटले आहे. या प्रकरणी नागपूर पालिकेच्या ९९ नगरसेवकांना अटक करण्यात आली असल्याची माहिती, विधानसभेत उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिल्याचंही परब म्हणाले.
 
चौकशी मागणी केली पण यांवर काहीच मनपा अधिकारी कारवाई करत नाही. यासर्व विरोधात अधिवेशनात अधिकाऱ्यावर हक्कभंग कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे परब यांनी सांगितले.