मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळावारी अर्ज भरणार असल्याचं समजतंय.
उमेदवारीची अधिकृत घोषणा उद्या दिल्लीतून होईल. त्यानंतर मंगळवारी राणे आपला अर्ज दाखल करतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
शिवसेनेनं दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांना उमेदवारी दिलीय.
2005 साली राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मालवणमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनेने राणेंचा पराभव करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, शिसेनेच्या उमेदवाराला डिपॉझिटही राखता आलं नव्हतं. आता मात्र चित्र वेगळ आहे.
शिवसेनेचं सत्ताकेंद्र असलेला मातोश्री बंगला या मतदारसंघात आहे. त्यामुळे आता राणे आपली सर्व ताकद पणाला लावतील, असं दिसतंय. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असून शिवसेना आणि राणेंसाठीही हा प्रतिष्ठेचा विषय बनलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.