नाशिक, मुंबईला हुडहुडी

राज्यात सर्वत्र हुडहुडी वाढली आहे, बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे ५.८ अंश होते, मुंबईचे किमान तापमान १२.६ अंश नोंदविण्यात आले. 

Updated: Jan 21, 2016, 08:41 AM IST
नाशिक, मुंबईला हुडहुडी title=

मुंबई : राज्यात सर्वत्र हुडहुडी वाढली आहे, बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे ५.८ अंश होते, मुंबईचे किमान तापमान १२.६ अंश नोंदविण्यात आले. 

हिमवृष्टीनंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्याने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. यामुळे राजधानी मुंबईसह राज्यही कुडकुडले. हे तापमान पुढील ४८ तासांसाठी हा थंडावा कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

राज्यभरातील तापमान अशं सेल्सिअसमध्ये
पुणे ८.२, अहमदनगर ७.६, जळगाव १०, महाबळेश्वर १०.५, मालेगाव ९.६, नाशिक ५.८, सांगली १५.४, सातारा ११, सोलापूर १६.३, उस्मानाबाद १२, औरंगाबाद १०.६, परभणी १२.२, नांदेड १३, अकोला ११.५, अमरावती ११.२, बुलडाणा १२.६, चंद्रपूर १६.४, गोंदिया १३, नागपूर १३.४, वाशिम १४.२, वर्धा १२.८, यवतमाळ १३, अलिबाग १४, रत्नागिरी १५.१

दक्षिण मध्य महाराष्ट्रात २३ जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता तसेच, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी २४ जानेवारी रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.