मुंबई : शहरात आज ऊन सावलीचं वातावरण असल्याने मुंबईकरांना आज उष्णतेपासून काही वेळ दिलासा मिळाला आहे .
दुपारी चार वाजेच्या सुमारासही वातावरण ढगाळ असल्याने ऑक्टोबर हिटचा तडाखा काहीसा कमी झाल्याचं दिसत होतं. यामुळे मुंबईच्या तापमानात काहीशी घट आज झाली होती. मुंबईचं तापमान आज सायंकाळी ५ वाजता ३१ अंश सेल्सिअस होतं.
ऑक्टोबर हिटच्या तडाख्याने मुंबईकर काहीसे त्रासले आहेत, मागील काही दिवस हे सुट्यांचे असल्याने मुंबईकरांना हा तडाखा जाणवला नाही, मात्र कार्यालय गाठतांना आणि परततांना प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारा मुंबईकरांना त्रस्त करतात, त्यात आज काहीसा दिलासा मिळाला.
नाशिक शहरात आज पावसाच्या सरी बरसल्या आहेत, दोन दिवसापूर्वीही नाशिक शहरात पाऊस झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.