मीरारोड : कॉल सेंटरवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 500 जणांना ताब्यात घेतलं. मीरा रोडच्या रॉयल कॉलेज शेजारी डेल्टा इमारतीतमध्ये कॉल सेंटर चालवण्याच येत होतं. मंगळवारी रात्री ठाणे सिटी क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलीय.
सदर कॉल सेंटर मधून परदेशात फोन करून टॅक्स रिव्हिजनच्या नावाखाली लोकांना लाखो डॉलरचा गंडा घातला जात असल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर मीरा रोडमध्येच आणखी दोन ठिकाणी कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी दोनशेहून अधिक पोलिसांचा वापर करण्यात आला. भारतात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे.