मुंबई : राज्यात डाळींची साठेबाजी करणाऱ्यांवर सरकारने धडक कारवाई सुरु केल्यानंतर डाळींचे भाव चढेच दिसून येत आहेत. किरकोळ दर कमी करुन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात डाळींचे साठे जप्त करण्यात आली. मात्र, सणासुदीत डाळींचे भाव १५० रुपयांच्यावरच दिसून येत आहेत. वाढत्या महागाईने सामान्य लोक हैराण झाली आहेत. डाळींचे भाव २० ते २५ रुपयांनी खाली आले असले तरी डाळ न परवडणारी अशीच आहे. तूर डाळ १६० रुपयांवर आहे. उडीद डाळ १४० रुपये तर मूग डाळ १०० रुपये आहे. चणाडाळ ६० रुपयांवर आहे.
येत्या काही दिवसात डाळींचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी साठेबाजी करणाऱ्या मल्टी नॅशनल कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.