पाक कलाकारांसाठी 'बजरंगी भाईजान' मैदानात

सर्व काही सुरूळीत सुरू असताना कशी घाण करावी, हे सलमानकडून शिकावे असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. तसं काहीसं पुन्हा सलमान खान याने केले आहे. आता त्याला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे. 

Updated: Nov 3, 2015, 04:46 PM IST
पाक कलाकारांसाठी 'बजरंगी भाईजान' मैदानात  title=

मुंबई : सर्व काही सुरूळीत सुरू असताना कशी घाण करावी, हे सलमानकडून शिकावे असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. तसं काहीसं पुन्हा सलमान खान याने केले आहे. आता त्याला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे. 

पाकिस्तानी कलाकारांना भारतात प्रवेशावरून सुरु असलेल्या वादावर आता सलमान खानही बोलला आहे.  कला आणि मनोरंजन यासारख्या क्षेत्रांना सीमा नसतात, मुळात या गोष्टी राजकारणापासून दूर ठेवायला हव्यात असं मत सलमान खानने व्यक्त केलं आहे.

सध्या डिजीटल युग आहे. भारतीयांना प्रत्येक मनोरंजक कार्यक्रम पाहण्याची इच्छा असते. यामध्ये पाकिस्तानी शोजचाही समावेश होतो. म्हणजेच कलांना सीमेचं बंधन नसतं. सामान्य माणसांना काय पाहायला आवडतं यावरून मनोरंजनाची व्याख्या ठरते’ असही सलमान खान म्हटला आहे. 

गेल्या महिन्यात पाकिस्तानी गझलकार गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेतर्फे विरोध करण्यात आला होता. तर पाक कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांनाही सेनेने विरोध दर्शवला होता.

‘राजकारण आणि कला यांची सरमिसळ होता कामा नये. ही सामान्य माणसांची इच्छा नाही. जर एखादा पाकचा कलाकार एखादी भूमिका चांगल्या प्रकारे साकारत असेल, तर त्याला आडकाठी कशाला. बॉलिवूडचे पाकिस्तानातही अनेक चाहते आहेत आणि तिथूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं’ अशी भूमिका सलमानने मांडली आहे.

बजरंगी भाईजानच्या माध्यमातून भारत-पाक संबंध सुरूळीत करण्याचा प्रयत्न सलमान खान याने केला होता पण त्यानंतरही पाकिस्तानकडून सीमेवर कारवाया सुरू आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.