मुंबईकरांना आता शनिवारीही मेगाब्लॉगचा मनस्ताप

मुंबईकरांची रेल्वे समस्या दिवसा गणिक वाढत आहे. यावर रेल्वे प्रशासनाने नविन शक्कल लढविली आहे. रेल्वे समस्या सोडविण्यासाठी आता रविवारआधी शनिवारी मेगाब्लॉग घेणार आहे. त्यामुळे रेल्वेचे मेगाब्लॉक आता शनिवारच्या मुळावरही उठले आहेत.

Updated: Nov 7, 2014, 01:32 PM IST
मुंबईकरांना आता शनिवारीही मेगाब्लॉगचा मनस्ताप title=

मुंबई : मुंबईकरांची रेल्वे समस्या दिवसा गणिक वाढत आहे. यावर रेल्वे प्रशासनाने नविन शक्कल लढविली आहे. रेल्वे समस्या सोडविण्यासाठी आता रविवारआधी शनिवारी मेगाब्लॉग घेणार आहे. त्यामुळे रेल्वेचे मेगाब्लॉक आता शनिवारच्या मुळावरही उठले आहेत.

मध्य रेल्वेमार्गावर सातत्याने होणारा गाड्यांना बिलंब आणि बिघाडांचा विचार करून या दुर्घटना टाळण्यासाठी देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉग घेण्याचा विचार केलाय. त्यामुळे काही रद्द होणाऱ्या सेवा, दिरंगाईने चालणाऱ्या गाडय़ा आणि प्रचंड गर्दी या गोष्टी प्रवाशांना शनिवारीही सहन कराव्या लागणार आहेत.

शनिवारी घेण्यात येणारा पहिला विशेष ब्लॉक ठाणे आणि दिवा या स्थानकांदरम्यान ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.  गेली अनेक वर्षे रेल्वे रविवारी न चुकता मेगाब्लॉक घेते. मात्र गेल्या काही महिन्यांत मध्य रेल्वेवर होणाऱ्या दुर्घटनात वाढ झालेय. तसेच तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेचा बोजवारा उडतो. त्यामुळे रविवारपाठोपाठ शनिवारीही विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हा पहिला मेगाब्लॉक उद्या शनिवारी ठाणे-कल्याण या स्थानकांदरम्यान सकाळी ९.३० ते ११.४५ या वेळेत घेण्यात येईल. या दरम्यान डाऊन जलद मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तर या दरम्यानच्या जलद गाडय़ा ठाणे ते कल्याणदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. त्यामुळे मेगाब्लॉकच्या कालावधीत ९ अप आणि ९ डाऊन अशा १८ सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.